Combined Defence Services Examination (CDSE) | संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (सी.डी.एस.ई.)

Combined Defence Services Examination (CDSE) | संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (सी.डी.एस.ई.) केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून दर वर्षी  वर्षातून दोनवेळा घेतली जाते, सैन्य, नौदल आणि वायुसेनेच्या कार्यालयात  रिक्त पदांची भरती करण्यासाठी हि परीक्षा घेण्यात येते. परीक्षेची अधिसूचना सामान्यतः ऑक्टोबर आणि जून महिन्यांत प्रसिद्ध केली जाते आणि परीक्षा अनुक्रमे फेब्रुवारी आणि नोव्हेंबरमध्ये घेण्यात येतात. केवळ अविवाहित पदवीधर  परीक्षा देऊ शकतात. लेखी परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांची मुलाखत सेवा निवड मंडळ (एस.एस.बी.) तर्फे  घेतली जाते, निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या मेरिट लिस्टच्या रँकिंगवर व अर्ज करतांना उमेदवाराने दिलेल्या पर्यायानुसार,  प्रशिक्षणासाठी खालीलपैकी एका संस्थेत पाठवले जाते

 1. भारतीय सैन्य अकादमी, देहरादून (M.A.)
 2. भारतीय नौदल अकादमी, एझिमाला (INA)
 3. वायुसेना अकादमी, हैदराबाद
 4. ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकॅडमी, चेन्नई

​​​

व्यक्तिगत पात्रता

​उमेदवार हा भारताचा नागरिक असावा.

 • नेपाल, भूतान चे नागरिक तसेच १ जानेवारी १९६२ आधी भारतात स्थलांतरित झालेले तिबेट चे आश्रित, व मुल भारतीय असलेले परंतु इथोपिया, केनिया, मलावी, म्यानमार, पाकिस्तान, श्रीलंका, टांझानिया, युगांडा, व्हिएतनाम, झायरे व झांबिया या देशातून भारतात कायमस्वरूपी स्थलांतरित झालेले नागरिक.

शैक्षणिक पात्रता

 • M.A. साठी आणि अधिकारी प्रशिक्षण अकादमी- एखाद्या मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा तत्सम.
 • N.A.भारतीय नौदल अकादमीसाठी एका मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेकडून अभियांत्रिकी पदवी.
 • वायुसेना अकादमीसाठी एक मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी (१०+ २ पातळीवर भौतिकशास्त्र आणि गणितसह) किंवा बॅचलर ऑफ इंजिनीयरिंग.

वयोमर्यादा (चालू वर्षाच्या ०१ ऑगस्ट या तारखेला)

 1. भारतीय सैन्य अकादमी = १९ ते २४ वर्षे
 2. भारतीय नौदल अकादमी = १९ ते २४ वर्षे
 3. वायुसेना अकादमी = १९ ते २२ वर्षे
 4. ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकॅडमी = १९ ते २५ वर्षे

परीक्षेचे स्वरूप

 • भारतीय सैन्य अकादमी, देहरादून (M.A.)
  • English – 2 Hrs. (100 marks)
  • General Knowledge – 2 Hrs. (100 marks)
  • Elementary Mathematics – 2 Hrs. (100 marks)

 • भारतीय नौदल अकादमी, एझिमाला (INA)
  • English – 2 Hrs. (100 marks)
  • General Knowledge – 2 Hrs. (100 marks)
  • Elementary Mathematics – 2 Hrs. (100 marks)

 • वायुसेना अकादमी, हैदराबाद
  • English – 2 Hrs. (100 marks)
  • General Knowledge – 2 Hrs. (100 marks)
  • Elementary Mathematics – 2 Hrs. (100 marks)

 • ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकॅडमी, चेन्नई
  • English – 2 Hrs. (100 marks)
  • General Knowledge – 2 Hrs. (100 marks)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here