How To Prepare

सध्या MPSC, UPSC, SSC, SET, NET, IBPS व या सारख्या अनेक स्पर्धा परीक्षांकडे आजच्या तरुण वर्गाचा कल अधिक आहे. व त्यातूनच स्पर्धा परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात तरुण तरुणी सहभागी होतात व परिणामी दिवसेंदिवस या हि स्पर्धा अधिक जोर धरते आहे. स्पर्धा परीक्षा द्यायचा म्हणजे जीव ओतून अभ्यास करावा लागतो पण हा अभ्यास कसा करावा, किती करावा याबाबत फारसे कोणी सांगू शकत नाही. परंतु अनेक मार्गदर्शन शिबिरे, लेख, यशस्वी लोकांच्या लेखणीतून वाचनात आलेले या ठिकाणी मांडत आहे.

स्पर्धा परीक्षा अभ्यास मुद्दे

 • अभ्यास कधीपासून करावा
 • ध्येय निच्छिती
 • पदाची/ परीक्षेची निवड
 • वेळापत्रक
 • वाचन
 • मुलाखतीची तयारी
 • उमेदवाराची पूर्वतयारी

 • स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी उमेदवाराने कधीपासून सुरवात करावी?
  • साधारणतः स्पर्धा परीक्षेसाठीची पात्रता हि पदवीधर व काही स्पर्धा परीक्षांची पात्रता कि पदवीत्तर पदवी अशी असते, परंतु अनेक स्पर्धा परीक्षांचे अर्ज करण्यासाठी पदवी परीक्षा पात्र असलेल्या उमेदवारांना सुद्धा ग्राह्य धरले जाते त्यामुळे ज्यांना स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून अधिकारी बनायचे आहे त्यांनी पदवीच्या प्रथम वर्षापासून परीक्षांचे अर्ज भरून फक्त अनुभव घेण्यासाठी विविध स्पर्धा परीक्षा देवू शकता पदवीचे प्रथम व द्वितीय वर्ष या कालावधीत उमेदवाराने शक्य असतील तितक्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या (MPSC, UPSC, SSC, IBPS, SET, NET) परीक्षा देवून स्पर्धा परीक्षा कशी असते त्याचे स्वरूप कसे असते परीक्षेचा अर्ज कसा भरायचा, अर्ज भरतांना कोणकोणते कागदपत्रे लागतात, कोणत्या परीक्षेचे अर्ज कोणत्या महिन्यात सुटतात व कोणत्या महिन्यात परीक्षा होते, आपल्यासोबत परीक्षेला आलेले अनुभवी परीक्षार्थी कोणत्या पुस्तकांचे वाचन करतात इत्यादी माहिती व अनुभव घ्यावा या अनुभवाचा वापर तुम्हाला तुमच्या ध्येय निच्छिती साठी करता येईल, प्रत्यक्ष अभ्यासाला तुम्ही पदवीच्या तृतीय किंवा अंतिम वर्षाला असतांना सुरवात करायला हवी जेणेकरून महाविद्यालयीन शिक्षण चालू असतांना त्या अभ्यासासोबतच तुमचा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास चालू असेल व महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासात तुम्ही इतर नवख्या उमेदवारांपेक्षा अनुभवी असाल.

 • ध्येय निच्छिती
  • जर आपण एखाद्या लहान मुलास विचारले कि मोठ होऊन तुला काय व्हायचं आहे तर ते मुल सहाजिक पोलीस, डॉक्टर, वकील, इंजिनिअर अस काहीतरी सांगत असतो त्याच प्रमाणे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना “कोणत्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो आहे” अस विचारल्यास १०० उमेदवारांपैकी ८०%-९०% उमेदवार सगळ्याच स्पर्धा परीक्षांचा अस उत्तर देतात १५%-१८% उमेदवार फक्त MPSC, UPSC किंवा बँकिंग अस कोणत्यातरी एका आयोगच किंवा परिक्षेच नाव सांगतील व उरलेले ३%-५% उमेदवार स्पष्टपणे IAS, IFS, RTO Officer, PSI, STI अस पदाच नाव घेतील.
  • जर तुम्ही ८०%-९०% जणांसारख सगळ्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असाल किंवा १५%-१८% जणांसारख MPSC, UPSC किंवा बँकिंग अस कोणत्यातरी एका आयोगाचा अभ्यास करत असाल तर तुमच ध्येय निच्छित नाही आहे अस म्हणायला हरकत नाही. पण जर तुम्ही ३%-५% उमेदवारांपैकी एक असाल तर तुमच ध्येय निच्छित आहे आणि तुम्ही योग्य दिशेने वाटचाल करत आहात. अनेक पदे हि एकाच आयोगातर्फे एकाच परीक्षेमार्फत जरी भरली जात असली तरी प्रत्येक पदाचे स्वरूप वेगळे असते त्या पदाच्या मुलाखतीसाठी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचे स्वरूप व आयोगाच्या उमेदवाराकडून असलेल्या अपेक्षा पदानुसार वेगवेगळ्या असतात. त्यामुळे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरु करतांना आपले ध्येय निच्छित करा व नंतरच अभ्यासाला लागा.

 • पदाची/ परीक्षेची निवड
  • सर्व प्रथम उमेदवाराने आपल्याला कोणत्या पदासाठी किंवा कोणत्या परीक्षेसाठी अभ्यास करायचा आहे हे बघावे, पद किंवा परीक्षा निवडतांना सदर पदासाठी/परीक्षेसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पात्रता, शारीरिक पात्रता व अतिरिक्त पात्रता आपल्याकडे आहे का याचा विचार करावा, त्याचप्रमाणे परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे, परीक्षेचे स्वरूप कसे आहे, परीक्षेचे टप्पे किती आहे, प्रश्नांचे स्वरूप कसे आहे, मुलाखत किती गुणांची व कश्या स्वरुपात होते याचा देखील विचार केला पाहिजे प्रत्येक पदाची/ परीक्षेची काठीण्य पातळी हि टी परीक्षा घेणाऱ्या आयोगावर अवलंबून असते त्यामुळे पदाची/ परीक्षेची निवड करतांना जे तुम्हाला सोयीस्कर वाटेल अश्या पदाची/ परीक्षेची निवड करा उगाच स्पर्धा परीक्षा द्यायची म्हणून सर्वच परीक्षा देवू सगळ्या परीक्षांचा अभ्यास करू, नशिबाने लागून जाऊ असा विचार  करून आपला वेळ वाया घालवू नका आपल्या पात्रतेनुसार अभ्यास करण्याची जिद्द मनात ठेवून परीक्षेची निवड करा.
  • UPSC, MPSC, SSC, IBPS व इतर अनेक स्पर्धा परीक्षांचे पदानुसार शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षेचे स्वरूप, अभ्यासक्रम अशी विस्तृत माहिती आम्ही आमच्या “पदांचे स्वरूप” या विभागात दिली आहे.

 • दैनंदिन वेळापत्रक
  • उमेदवाराने पदाची/ परीक्षेची निवड केल्यानंतर येणाऱ्या काळात सदर परीक्षा किती कालावधीत होणार आहे याचा अंदाज घेवून दैनंदिन वेळापत्रक बनवावे, सदर परीक्षा किती कालावधीत आहे त्यानुसार वेळापत्रकात बदल आवश्यक आहे, सकाळी उठणे. आवरणे, जेवण व रात्रीची झोप अश्या मुलभूत गोष्टी सोडल्या तर उमेदवाराने आपले वेळापत्रक जास्तीत जास्त अभ्यासाच्या स्वाधीन करावे
  • दैनंदिन वेळापत्रकामध्ये वृत्तपत्र वाचन, संदर्भ ग्रंथ वाचन, प्रश्नपत्रिका सराव, सामान्य ज्ञान अध्ययन, लेखन या गोष्टींचा अंतर्भाव असायलाच हवा
  • स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरु केल्यानंतर उमेदवाराने आपला अमुल्य वेळ वाया घालवता कामा नये त्यामध्ये
   • सकाळी लवकर उठण्याचा कंटाळा करणे
   • मोबाईल मध्ये टाईमपास करणे (उमेदवाराने Whats app, Facebook बंद करणे हा सर्वोत्तम पर्याय)
   • गरज नसतांना अभ्यासातून ब्रेक घेणे
   • दुपारची झोप काढणे
   • अभ्यास सोडून निकाल कसा लागेल, कट ऑफ काय लागणार, कोणता मुव्ही आला आहे, क्रिकेट या सारख्या विषयांवर वायफळ चर्चा करणे
   • रविवारी अभ्यासाला सुट्टी घेणे

अश्या व इतर कारणांमुळे उमेदवाराने आपला वेळ बिलकुल वाया घालवू नये लक्षात ठेवा जेंव्हा तुम्ही वेळ वाया घालवत असता तेंव्हा इतर उमेदवार अभ्यास करून वेळेचा सदुपयोग करत असतात

 • वाचन
  • स्पर्धा परीक्षांमध्ये मध्ये किंवा मुलाखतीमध्ये मोठ्या प्रमाणात चालू घडामोडींवर प्रश्न विचारले जातात. व चालू घडामोडींच्या अभ्यासासाठी वृत्तपत्र वाचन महत्वाचा भाग आहे, वृत्तपत्रामध्ये स्थानिक घडामोडींपासून ते आंतरराष्ट्रीय घडामोडींपर्यंत सर्व घटनांची आकडेवारी, वर्णन, विश्लेषण, यांचा अंतर्भाव असतो. वृत्तपत्रे हे अद्ययावत माहितीचे आदानप्रदान करणारे स्त्रोत, तसेच दृष्टीकोन आणि विश्लेषणाचा महत्वपूर्ण स्त्रोत आहे
  • सर्वप्रथम वृत्तपत्रातील अभ्यासक्रमाला पूरक ठरणारे लेख आणि संपादकीय बाबींचे प्रामुख्याने वाचन करावे. वृत्तपत्रातील लेख दृष्टिकोन पुरवणारे, विषयाचे विविध आयाम स्पष्ट करणारे असतात. प्रथम वाचनातच संबंधित लेखाचे आकलन व्हावे ही अपेक्षा चुकीची ठरते. सुरुवातीला १०-२० टक्क्यांवर समाधान मानायला हरकत नाही. सातत्याने वाचन करीत राहिल्यास पुढे काही कालावधीनंतर लेखांचे समग्र आकलन व्हायला वेळ लागणार नाही. लेख वाचून त्यातून महत्त्वाचे मुद्दे बाजूला काढावेत आणि स्वतंत्र पानावर त्या त्या मुद्दय़ांचा आपल्या भाषेत विस्तार करावा किंवा सारांश लिहून काढावा. आपण लिहून काढलेले सारांश पुन्हा एकवार संपादित करून अधिक बंदिस्त आणि गोळीबंद करावेत. ही प्रक्रिया दैनंदिन स्वरूपाची आणि सातत्यपूर्ण असायला हवी. परिणामी, या प्रक्रियेद्वारे आकलनाच्या जोडीला लेखनकौशल्ये विकसित करण्याची संधीही प्राप्त होते. मुख्य परीक्षेकरता वर्तमान घडामोडींच्या अभ्यासासाठी वृत्तपत्रातील संपादकीय पानाचा प्रामुख्याने विचार करावा लागतो. त्यावर संपादकीय टिप्पणीसोबत स्थानिक, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय वर्तमान घडामोडींवर अभ्यासकांचे लेख अर्थात समीक्षात्मक भाष्य, विश्लेषणात्मक लेख अंतर्भूत असतात. संबंधित लेखांमध्ये विषयाची विविध अंगे, उपघटक दाखवून त्यांचे विश्लेषणही समाविष्ट केलेले असते. अभ्यासकाने त्यात केलेली विषयाची रचना, त्यातील विधाने आणि समीकरणे, भाषाशैली तसेच त्यातील नवे शब्द सातत्याने आत्मसात करावेत.  अभ्यासक्रमाचे सर्वसाधारण घटक पाडून त्यानुसार वर्तमान घडामोडींचे वर्गीकरण करावे. उदा.सामाजिक, राजकीय, भौगोलिक, आर्थिक इत्यादी घटकांनुसार वृत्तपत्रातील कात्रणे दररोज काढावीत किंवा संबंधित घटना स्वतंत्रपणे टिपून ठेवाव्यात. पुढे महिन्याच्या शेवटी वर्तमान घडामोडींची घटकांनुसार स्वतंत्र संदर्भवही तयार होत राहते. अशी वर्तमान संदर्भवही तयार करण्यासाठी द हिंदू, इंडियन एक्स्प्रेस, योजना, कुरुक्षेत्र, बुलेटिन, सायन्स रिपोर्टर इत्यादींचा वापर करण्यास हरकत नाही.
  • उमेदवाराने पदानुसार/परीक्षेनुसार संदर्भ ग्रंथाचे वाचन करावे मागील प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करून ज्या घटकांवर अधिक प्रश्न विचारले आहेत त्याचे वाचन करून उमेदवाराने स्वतंत्रपणे नोंदी घ्याव्यात इतिहास, भूगोल, विज्ञान या विषयांवरील पुस्तके उमेदवाराने नियमित वाचावीत. स्पर्धा परीक्षेत टिकून राहायचे असल्यास ज्या गोष्टी माहित नाहीत, त्या समजून घेण्याची वृत्ती असावी. केवळ वाचन नाही तर लिहिता आले पाहिजे. लिखाणाकडे विशेष लक्ष द्यावे. वाचनाने विविध विषयांचे पैलू समजून घेता येतात. पण वाचलेले लिखाणात उतरविता येण्याची क्षमता उमेदवारामध्ये निर्माण व्हायला हवी. उमेदवारांना त्यांच्या लिखाणातून व्यक्त होता आले पाहिजे.

 • मुलाखतीची तयारी
  • अभ्यास करतांना मुलाखतीची तयारी का? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल! रोज अभ्यास करून कंटाळा येत असेल किंवा चेंज हवा असेल तर तुम्ही अभ्यासिकेतील इतर उमेदवारांसोबत इतर गोष्टींवर चर्चा करून वेळ वाया घालवण्यापेक्षा मुलाखतीची तयारी करू शकता यातून तुम्हाला थोड रिलाक्स पण वाटेल आणि तुमची मुलाखतीला सामोरे जाण्याची तयारी पण होईल. सदर तयारी करताना मागील मुलाखतीमध्ये विचारलेल्या प्रश्नांची एक यादी तयार करा व त्या प्रश्नांना आपल्या शैलीत उत्तरे देण्याचा प्रयत्न करा लक्षात ठेवा मुलाखत हि आपण उत्तर किती बरोबर किंवा चुकीच देतो यापेक्षा आपण बोलताना आपल्यात आत्मविश्वास किती आहे आपण समोरच्या व्यक्तीला नजरेला नजर मिळवून बोलतो का?, आपण बोलताना अडखळतो आहे का? आपल्याला प्रश्न समाजाला आहे का? या कडे मुलाखत घेणाऱ्यांचे जास्त लक्ष असते त्यामुळे तयारी करतांना स्वताचा अभ्यास करा आपण जिथे कमी पडतो आहे तिथे लक्ष द्या मुलाखत हि उमेदवार निवडीची शेवटची पायरी असते त्यामुळे खुर्चीवर बसण्यापासून आलेल्या प्रश्नाला अनुसरून आत्मविश्वासाने उत्तर देणे हे उमेदवाराल अआलेच पाहिजे.​

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी मिळविण्यासाठी जी धडपड करावी लागते व त्याची गंभीरता शब्दात व्यक्त करणे अवघड आहे. त्याचा अनुभव आपल्यापैकी अनेक जणांनी या आधीच घेतला असेल किंवा येणाऱ्या काळात या परिस्थितीला सामोरे जावे लागणार आहे. नोकरी शोधतांना, अर्ज भरतांना, मुलाखत देतांना व स्पर्धेच्या जगात स्वताला सिद्ध करण्यासाठी प्रत्येक उमेदवाराने पुढील काही गोष्टींची काळजी घेतली तर आपली खूप धावपळ वाचणार आहे. सरकारी नोकरी असो किंवा खाजगी, आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या जगात आपण स्वताला अपडेट ठेवले पाहिजे, व त्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग हा करावाच लागणार आहे.

या विभागात आम्ही खालील मुद्द्यांवर माहिती देत आहे

 • कागदपत्रे

 • बायोडाटा

 • इमेल आयडी

 • फोटो व सही (स्वाक्षरी)

 • आधार कार्ड

 • महत्वाची कागदपत्रे

 • कागदपत्रे

प्रत्येक उमेदवाराने आपल्या कागदपत्रांची विशेष काळजी घेतली पाहिजे व त्याचप्रमाणे गरजेच्या वेळी ते सादर सुद्धा करता यायला पाहिजे. शैक्षणिक कागदपत्रांसोबत अनेक प्रकारचे दाखले, प्राविण्य दाखले व इतर अनेक उपक्रमांमध्ये मिळवलेली प्रमाणपत्रे हि कोणत्या वेळी कुठे उपयोगात येतील सांगू शकत नाही त्यामुळे उमेदवाराने आपल्या कागदपत्रांना फक्त लॅमिनेशन न करता पुढील गोष्ठी सुद्धा कराव्या.

 • झेरॉक्स

  • आपल्याला मिळणारे प्रत्येक प्रमाणपत्र, गुणपत्रक, दाखला व इतर महत्वाचा दस्तऐवज उमेदवाराने कमीत कमी १० ते ३० प्रती झेरॉक्स करून ठेवणे गरजेचे आहे.

 • साक्षांकन

  • आपण झेरॉक्स केलेले कागदपत्रांचे सत्यप्रत साक्षांकन करून घेणे हि गरजेचे आहे (उदा. १० वी ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर १० वी चा शाळा सोडायचा दाखला, १० वी चे प्रमाणपत्र व गुणपत्रक याच्या कमीत कमी ५ ते १० प्रती आपल्या शाळेच्या मुख्याध्यापक/मुख्याध्यापिका यांचे कडून शाळेच्या शिक्यासह साक्षांकित करून ठेवावे) सदर साक्षांकित प्रती ह्या आपल्याकडे जपून ठेवाव्या, महाविद्यालयातील प्रवेश किंवा इतर कुठेही त्या वापरू नये, या साक्षांकित प्रतीचा उपयोग आपणास आपले मुळ कागदपत्रे हरवल्यास त्यांची दुय्यम प्रत काढण्यासाठी तसेच पासपोर्ट काढण्यासाठी होतो, इतर कामासाठी आपण इतर दुसऱ्या अधिकाऱ्याच्या साक्षांकित प्रती देऊ शकतो.

 • फायलिंग

  • आपल्या सर्व मूळ कागदपत्रांची एक वेगळी फाईल करावी व ती सुरक्षित ठिकाणी ठेवून द्यावी

  • इतर कामांसाठी झेरॉक्स प्रतींची एक वेगळी फाईल करावी व नियमित कामासाठी ती वापरावी जेणेकरून मूळ कागदपत्रांची हेळसांड होणार नाही.

 • डीजीटल लॉकर

  • भारत सरकारतर्फे नागरिकांना आपली कागदपत्रे डीजीटल स्वरुपात सुरक्षित ठेवण्यासाठी एक संकेतस्थ;ल तयार केले असून यावर आपण आपली सर्व कागदपत्रे संकेतस्थळावर साठवून ठेवू शकतो व जेंव्हा गरज असेल तेंव्हा आपण ती डाउनलोड करून वापरू शकतो. परंतु या सेवेत आपण एक कागदपत्र वेगवेळ्या साईज व फॉरमॅट मध्ये नाही ठेवू शकत त्यासाठी आपल्याला इमेल चा पर्याय आहे

 • इमेल कॉपी

  • डीजीटल लॉकर प्रमाणे आपण आपल्या ईमेल वर आपली कागदपत्रे साठवून ठेवू शकतो, नोकर भरतीचा ऑनलाईन अर्ज भरतांना अनेक वेळेस आपल्याला आपले कागदपत्रे एकत्र PDF किंवा JPEG फॉरमॅट मध्ये अपलोड करावे अशी सूचना असते व त्याच प्रमाणे प्रत्येक कागदपत्राची साईज लिमिट सुद्धा वेगवेगळी  दिलेली असते आपण संगणकाचा वापर करून अर्ज करत असू तर एकवेळेस आपण कागदपत्रांची साईज कमी जास्त करू शकतो पण मोबाईल ते शक्य होत नाही, त्यामुळे इमेल वर कागदपत्रे सेव करताना ते विविध साईज व विविध फॉरमॅट मध्ये सेव करावे, फाईल सेव करण्यासाठी फॉरमॅट व साईज पुढीलप्रमाणे

   • फॉरमॅट

    • PDF

    • JPEG

   • साईज (प्रत्येक कागदपत्राची फॉरमॅट नुसार खालील साईज मध्ये वेगवेगळे स्कॅन करावे )

    • १०० के.बी.

    • २०० के.बी.

    • ५०० के.बी.

    • १ एम.बी.

    • २ एम. बी

जर आपल्याला संगणक व्यवस्थितपणे हाताळता येते व आपण पाहिजे तेंव्हा स्कॅन केलेल्या कागदपत्राची साईज आपल्या गरजेनुसार कमी जास्त करू शकता किंवा JPEG फॉरमॅट PDF मध्ये बदलू शकता तर आपण कागदपत्रे ३०० DPI मध्ये JPEG फॉरमॅट मध्ये स्कॅन करून ठेवू शकता पण जर आपणास हे जमत नसेल तर वर दिल्या प्रमाणे वर दिल्या प्रमाणे वेगवेगळ्या फॉरमॅट व साईज मध्ये स्कॅन करून ठेवावे जेणेकरून आपला वेळ वाचेल व आपणास अडचण येणार नाही.

 • मोबाईल कॉपी

  • विविध फॉरमॅट व साईज मध्ये स्कॅन केलेली कागदपत्रे नेहमी आपल्या मोबाईल मध्ये ठेवावी जेणेकरून गरज भासेल तेंव्हा अर्ज भरण्यासाठी किंवा छापील प्रत काढण्यासाठी त्याचा उपयोग केला जाऊ शकतो.

 • ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी संपूर्ण माहिती असलेला बायोडाटा

  • आजकाल जवळजवळ सर्वच सरकारी व खाजगी आस्थापनांची नोकरभरती हि उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने मागवून केली जाते. अश्या  वेळेस ऑनलाईन अर्ज भरतांना आपण आपले सर्व कागदपत्रांची फाईल सोबत घेवून फिरतो, त्यापेक्षा यावर उपाय म्हणून डीजीटॉक तर्फे आपणास एक बायोडाटा नमुना उपलब्ध करून देत आहोत, सदर नमुना डाउनलोड करून त्यात नमूद केल्याप्रमाणे सर्व माहिती उमेदवाराने भरून त्याची प्रिंट मारून आपल्या खिश्यात ठेवली तर आपल्याला शैक्षणिक कागदपत्रे सोबत घेवून फिरावी लागणार नाही.

 • मुलाखती च्या वेळी सोबत ठेवायचा बायोडाटा

  • साधारणपणे वयाच्या ५ व्या वर्षापासून ते २३-२५ वर्षापर्यंत शिक्षण घेऊन झाल्यानंतर आपले सगळे शैक्षणिक आयुष्य आपण आपल्या बायोडाटा वर उतरवतो, एक प्रकारे तो आपला आरसाच असतो, आपला बायोडाटा इतरांपेक्षा अधिक आकर्षक व मोजक्या शब्दात अधिक माहिती देणारा असला पाहिजे उगाच बिनकामाच्या गोष्टी घालून तो वाढवू नये. डीजीटॉक वर आपणास बायोडाटा चे अनेक नमुने उपलब्ध करून देत आहोत.

 • इमेल आयडी
 • ऑनलाईन पद्धतीने अर्ज करतांना किंवा लेखी स्वरूपातील अर्जावर अनेक वेळेस इमेल आयडी टाकावा लागतो व हे अत्यंत महत्वाचे आहे प्रत्येक उमेदवाराने आपला स्वताचा इमेल आयडी बनवून घेणे व संबंधित ठिकाणी इमेल आयडी टाकतांना स्वताचा इमेल आयडी टाकणे खूप गरजेचे आहे, कारण परीक्षा अर्ज भरल्या नंतर संबंधित विभागाकडून भरती संबंधीचे पत्रव्यवहार इमेल मार्फत केले जातात व अनेक वेळेस परीक्षेचे प्रवेशपत्र व निकाला संबंधीची माहिती इमेल द्वारे पाठवली जाते त्यामुळे उमेदवाराने अर्ज करतांना इमेल आयडी काळजीपूर्वक भरावा.

फोटो व सही

 • ऑनलाईन पद्धतीने अर्ज करतांना किंवा लेखी स्वरूपातील अर्जावर व बायोडाटा या सर्व ठिकाणी प्रत्येक उमेदवाराला आपला पासपोर्ट साईज फोटो द्यावा लागतो. त्यामुळे फोटो काढण्यापासून ते त्याचा वापर करण्यापर्यंत उमेदवाराने खालील गोष्टींचे पालन करावे.

 • पासपोर्ट साईज फोटो काढतांना फोटोचे bagroung हे पांढऱ्या रंगाचे ठेवावे व ऑनलाईन पद्धतीने अर्ज करतांना किंवा लेखी स्वरूपातील अर्जावर फोटो चीटकवतांना तो फोटो ३ महिन्यापेक्षा जास्त जुना असू नये तसेच सदर फोटोची आपल्याकडे ४-५ प्रती असणे आवश्यक आहे, कारण अनेक वेळेस स्पर्धा परीक्षांच्या ऑनलाईन काढलेल्या प्रवेशपत्रावर आपण अर्ज करतांना जो फोटो अपलोड केला आहे तसाच फोटो चिटकवून त्यावरती राजपत्रित अधिकाऱ्याचे साक्षांकन घावे लागते.

 • पासपोर्ट साईज फोटो काढतांना फोटोचे bagroung हे पांढऱ्या रंगाचे ठेवावे व ऑनलाईन पद्धतीने अर्ज करतांना किंवा लेखी स्वरूपातील अर्जावर फोटो चीटकवतांना तो फोटो ३ महिन्यापेक्षा जास्त जुना असू नये तसेच सदर फोटोची आपल्याकडे ४-५ प्रती असणे आवश्यक आहे, कारण अनेक वेळेस स्पर्धा परीक्षांच्या ऑनलाईन काढलेल्या प्रवेशपत्रावर आपण अर्ज करतांना जो फोटो अपलोड केला आहे तसाच फोटो चिटकवून त्यावरती राजपत्रित अधिकाऱ्याचे साक्षांकन घावे लागते.
 • त्याचप्रमाणे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करतांना किंवा लेखी स्वरूपातील अर्जावर सही करतांना आपण नेहमी जी सही करतो तीच करावी, अनेक वेळेस परीक्षा केंद्रावर उमेदवाराची ओळख करतांना उमेदवाराला सही करावी लागते व ती सही अर्ज करतांना केलेल्या अहि सही जुळवून बघितली जाते. त्यामुळे सही करतांना उमेदवाराने काळजीपूर्वक नेहमीचीच सही करावी.

 • ऑनलाईन पद्धतीने अर्ज करतांना वेगवेगळ्या अर्जासाठी फोटो व सही ची साईज वेगवेगळ्या स्वरुपात असते त्यामुळे उमेदवाराने खाली नमूद केलेल्या साईजनुसार आपले फोटो व सही स्कॅन करून आपल्या इमेल ला किंवा डीजीटल लॉकर मध्ये सेव करून ठेवावी जेणेकरून अर्ज भरतांना आपणास ते सोपे जाईल.

 • वेगवेगळ्या अर्जासाठी लागणारी फोटो व सही ची साईज

 • महाराष्ट्र लोकसेवा आयोग

फोटो      =          रुंदी ३.५ सेमी व उंची ४.५ सेमी

सही       =          रुंदी ३.५ सेमी व उंची १.५ सेमी

 • महारिकरूटमेंट

फोटो      =          रुंदी ३.५ सेमी व उंची ४.५ सेमी

सही       =          रुंदी ३.५ सेमी व उंची १.५ सेमी

 • स्टाफ सिलेक्शन

फोटो      =          रुंदी ११० पिक्सल  व उंची १४० पिक्सल

सही       =          रुंदी १४०  पिक्सल  व उंची ११०  पिक्सल

 • केंद्रीय लोकसेवा आयोग

फोटो      =          रुंदी ११० पिक्सल  व उंची १४० पिक्सल

सही       =          रुंदी १४०  पिक्सल  व उंची ११०  पिक्सल

 • IBPS | आय. बी. पी. एस.

फोटो     =          २० ते ५० केबी

सही       =          १० ते २० केबी ​​

आधार कार्ड अपडेट व लिंकिंग

 • आधार कार्ड हे अत्यंत महत्वाचे कागदपत्र असून प्रत्येक उमेदवाराने ते अपडेट ठेवले पाहिजे व सरकार ने वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांप्रमाणे ते लिंक केलेले असावे, आधार कार्ड हे केंद सरकार द्वारे दिले जाणारे ओळखपत्र असूनजवळ जवळ सर्वरच सरकारी व खाजगी क्षेत्रातील कामकाजासाठी आधार कार्ड ला प्राधन्य देण्यात येते, फक्त आपला आधार कार्ड नंबर टाकल्यावर आपले नाव, जन्म तारीख, पत्ता, फोटो या स्वरुपाची माहिती गरजेच्या ठिकाणी दिसत असते त्यामुळे आधार कार्ड हे अचूक अपडेट असले पाहिजे आधार कार्ड अपडेट संबंधी अधिक माहिती पुढीलप्रमाणे

 • नाव : आपल्या शैक्षणिक कागदपत्रांवरील व इतर महत्वाच्या कागदपत्रांवरील नावाच्या स्पेलिंग प्रमाणेच आपल्या आधार कार्ड वरील स्पेलिंग असली पाहिजे

 • जन्म तारीख : आधार कार्ड वर उमेदवाराची जन्मतारीख हि DD/MM/YYYY या स्वरुपात असली पाहिजे तसेच ती देखील शैक्षणिक कागदपत्रांप्रमाणे असली पाहिजे

 • पत्ता : सध्या आपण ज्या पत्त्यावर राहत आहात तोच पत्ता आधार कार्ड वर देखील असला पाहिजे जेणेकरून, नोकरीसंदर्भात आपल्याशी होणारा पत्र व्यवहार योग्य रीतीने होईल

 • फोटो : आधार कार्ड वरील फोटो व आपल्या चेहऱ्यात जास्त बदल असेल किंवा आधार कार्ड वरील फोटो लहानपणीचा असेल तर तो देखील अपडेट करून घ्यावा

 • संपर्क नोंदी : अनेक सरकारी सुविधांसाठी आधार कार्ड हे निकडीचे करण्यात आलेलेल आहे. व या सुधींचा लाभ घेण्याकरिता आधार कार्ड धारकाची ओळख पटविण्यासाठी आधार कार्ड वर जो मोबाईल नंबर व इमेल आयडी रजिस्टर आहे त्यावर OTP पाठविण्यात येतो व तो OTP वेरीफाय केल्यानंर आपल्याला हव्या असलेल्या योजनेसाठी अर्ज करता येतो किंवा त्याचा लाभ घेता येतो, सध्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने देखील स्पर्धा परीक्षांचे अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी आधार कार्ड असणे बंधनकारक केले आहे व भविष्यात अनेक ठिकाणी आधार कार्ड निकडीचे होणार आहे त्यामुळे प्रत्येक उमेदवाराने आपल्या आधार कार्ड वर आपला मोबाईल नंबर व इमेल आयडी अपडेट करणे गरजेचे आहे.

महत्वाची कागदपत्रे

 • कोणत्या नोकरीसाठी उमेदवाराची निवड करतांना ती कागदपत्रांच्या आधारावर होत असते. उमेदवाराकडे सर्व शैक्षणिक कागदपत्रे, प्रशस्तीपत्रे, व दाखल्यांचा यात समावेश होतो

 • प्रत्येक उमेदवाराने आपली मुल कागदपत्रे जपून ठेवली पाहिजे तसेच ज्या कागदपत्रांची पडताळणी करणे किंवा नुतनीकरण करणे गरजेचे आहे ते देखील वेळो वेळी केले पाहिजे जेणेकरून कागदपत्रे पडताळणीच्या वेळेस योग्य किंवा अपुऱ्या कागदपत्रांअभावी आपणास डावलले जाऊ नये

 • महत्वाची कागदपत्रे पुढीलप्रमाणे

  • शैक्षणिक गुणपत्रके (Mark sheets)

  • शैक्षणिक प्रमाणपत्रे (Certificates)

  • जन्म प्रमाणपत्र / वय प्रमाणपत्र (Age Certificate)

  • शाळा सोडायचे दाखले (LC)

  • महाविद्यालय हस्तांतर प्रमाणपत्र (TC)

  • कोर्स / विशेष प्राविण्य प्रमाणपत्रे (Extra Curriculum Activities Certificate)

  • अनुभव असल्यास अनुभव प्रमाणपत्र (Experience Certificate)

  • सेवायोजन कार्यालयाचे नोंदणी कार्ड (Employment Registration)

  • गुणवत्ताधारक खेळाडू प्रमाणपत्र (Sports Certificate)

  • जातीचा दाखला (Cast Certificate)

  • जात पडताळणीचा दाखला (Caste Validity Certificate)

  • रहिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)

  • राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र (Nationality Certificate)

  • नॉन क्रिमी लेअर प्रमाणपत्र (Non Creamy Layer Certificate)

  • शिधा पत्रिका (Ration Card)

  • आधार कार्ड (UID Aadhar)

  • बँक पासबुक (Bank Passbook)

  • मतदान कार्ड (Voter ID)

  • वाहन चालक परवाना हलके वाहन, जड वाहन(Driving License LMV,HMV,Transport )

  • पासपोर्ट (Passport)

  • पॅन कार्ड (PAN Card)

  • अपंग असल्यास अपंगत्वाचे प्रमाणपत्र (Physically Handicap Certificate)

  • अपंग असल्यास स्वावलंबन कार्ड (Government Scheme Registration)

  • नावात, धर्मात किंवा जन्मतारखेत बदल असल्यास राजपत्र (Gazette)

  • अल्प भूधारक असल्यास प्रमाणपत्र (Small Land Holder Certificate)

  • शेतकरी असल्यास प्रमाणपत्र (Farmer Certificate)

  • भूमिहीन असल्यास प्रमाणपत्र (Landless Certificate)

वर नमूद केल्या प्रमाणे उमेदवाराच्या वैयक्तिक परिस्थितीनुसार जे काही गरजेचे आहे अशी सर्व प्रमाणपत्रांच्या मूळ प्रती तसेच साक्षांकित केलेल्या झेरॉक्स प्रती उमेदवारांकडे असणे गरजेचे आहे. त्याच प्रमाणे सर्व कागदपत्रांवर नावाच्या स्पेलिंग मध्ये, जन्म तारखेत बदल नको बदल असल्यास संबंधित विभागाकडून तो दुरुस्त करून घ्यावा किंवा त्या संबंधी राजपत्र तयार करून घ्यावे.