Pune Municipal Corporation inviting online applications from eligible candidates to fulfill 150 vacancies of Data Entry Operator

Recruitment Overview
Name of Organization Total No Of Vacancies
Pune Municipal Corporation 150
Recruiter Official Website
https://www.pmc.gov.in/
Application Mode Application Period
11 July 2020 to 13 July 2020 Online
Posts Details
Post Name Data Entry Operator
No of Vacancies 150 Vacancies
Pay Scale 19250/-
Qualification & Experience
 • Graduation or
 • HSC Pass
 • 30 WPM Marathi Typing
 • 40 WPM English Typing
 • MSCIT or CCC Certificate
Age Limit Upto 40 Years

Selection Procedure
Candidate Selection Will be done as per Educational Qualification

Candidates will shortlisted as per education qualification

shortlisted candidates have to face typing test

Candidates who successfully pass typing test will be selected

How to Apply
Interested and eligible candidates are advised to visit https://bit.ly/2ZdddLQ and fill application
Note
Duration of job will be 90 days


Details in Marathi

पुणे महानगरपालिका

जाहीरात प्रकटन पुणे महानगरपालिकेचे Covid care center (CCC) येथील कामकाजाकरिता ९० दिवस कालावधीसाठी, निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात, रक्कम रु.१९,२५०/- एकवट मासिक एकवट वेतनावर एकूण १५० उमेदवार “डाटा एन्ट्री ऑपरेटर” म्हणून नियुक्त करावयाचे आहेत. त्याकरिता किमान अर्हता खालील प्रमाणे आहे,

 1. उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा किंवा उच्च माध्यमिक/HSC परीक्षा उत्तीर्ण असावा, (पदवीधर उमेदवार पुरेसे उपलब्ध झाले नाहीत, तरच केवळ उच्च माध्यमिक/HSC परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांचा विचार केला जाईल) आ) मान्यताप्राप्त (GCC) मराठी ३० आणि इंग्रजी ४० शप्रमि टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण असावा, इ) MS-CIT किंवा समकक्ष संगणक अर्हता परीक्षा उत्तीर्ण असावा.
 2. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या इंग्रजी टंकलेखन ४० शप्रमि या परीक्षा स्तरानुसारउमेदवारास टंकलेखन चाचणी द्यावी लागेल.
 3. उमेदवारांची निवड अर्हतेनुसार व गुणवत्तेनुसार करण्यात येईल, वय वर्षे १८ ते ४० वयोगटातील शारीरिकदृष्ट्या सक्षम उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.
 4. ऑनलाईन अर्ज दिनांक 99/०७/२०२० ते दिनांक 93/०७/२०२० अखेर करता येतील, समक्ष अर्ज स्विकारले जाणार नाहीत.

या नियुक्तीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक, आवश्यक इतर अटी व शर्ती, सूचना, निवड पद्धत इ. माहिती पुणे महानगरपालिका www.pmc.gov.in या संकेतस्थळावर भरती या सदरात प्रसिद्धीस दिलेली आहे त्या अवलोकन करून उमेदवारांनी अर्ज करावेत.

विषय : कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपायाबाबत.

पुणे महानगरपालिकेचे Covid care center (CCC) येथील कामकाजाकरिता एकवट वेतनावर, ९० दिवस कालावधीसाठी, तात्पुरत्या स्वरुपात “डाटा एन्ट्री ऑपरेटर” नियुक्त करणेबाबत.

अर्ज करण्याची पद्धत व सूचना

 • उमेदवारांनी अर्ज पुणे महानगरपालिका संकेतस्थळावर भरती या सदरात दिलेल्या माहितीप्रमाणे सादर करावा.
 • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक पुढील प्रमाणे आहे, https://bit.ly/2ZdddLQ
 • अर्हता, वयोमर्यादा जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे राहील.
 • महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या इंग्रजी टंकलेखन ४० शप्रमि या परीक्षा स्तरानुसारउमेदवारास टंकलेखन चाचणी द्यावी लागेल. (याबाबत ठिकाण व वेळ इत्यादी माहिती दिनांक १३/०७/२०२० नंतर www.pmc.gov.in या संकेतस्थळावर भरती या सदरात प्रसिद्धकेली जाईल)
 • उमेदवारांची निवड अर्हतेनुसार व गुणवत्तेनुसार करण्यात येईल.
 • उमेदवाराने धारण केलेल्या अर्हतेमधील पदवी/उच्च माध्यमिक परीक्षा (HSC), इंग्रजी टंकलेखन चाचणी परीक्षा, MS-CIT परीक्षा/समकक्ष परीक्षा यामधून एकूण जास्तीत-जास्त गुण मिळविलेल्या उमेदवारांची निवड केली जाईल.
 • गुणदान खालील प्रमाणे असेल
पदवीपरीक्षा उच्च माध्यमिकपरीक्षा टक्केवारी माध्यमिकपरीक्षा टक्केवारी परीक्षा टक्केवारी टंकलेखन
१० गुणांच्या स्केलवर ठरविले जाईल १० गुणांच्या स्केलवर ठरविले जाईल इंग्रजी टंकलेखन चाचणी परीक्षा गुण
६७% = ६.७ गुण ७४% = ७.४ गुण  महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,पुणे यांच्या इंग्रजी टंकलेखन ४० शप्रमि परीक्षा स्तरानुसार घेण्यात येणाऱ्या चाचणी परीक्षेत उमेदवारास प्राप्त होणारे गुण.
 • उमेदवाराने स्वतःचे नाव, गुण, टक्केवारी इत्यादी माहिती बिनचूक भरणे आवश्यक आहे.
 • निवड झालेल्या उमेदवारांना विहित नमुन्यात करारनामा करून द्यावा लागेल, तसेच पुणे महानगरपालिकेचे Covid care center (CCC) येथे ३ शिफ्टमध्ये काम करावे लागेल.
 • या नियुक्तीचे सेवेमुळे उमेदवारांस अन्य कोणत्याही पदावर नियुक्ती मिळण्याचा अथवा समावेशनाचा अधिकार प्राप्त होणार नाही अथवा हक्क सांगता येणार नाही.
 • महानगरपालिका प्रशासनास आवश्यकता वाटल्यास उमेदवारांचा नियुक्तीचा कालावधी ९० दिवसांपेक्षा जास्त वाढविला जाऊ शकतो किंवा कमी सुद्धा केला जाऊ शकतो, तसेच आवश्यकतेनुसार पदसंख्या देखील कमी अगर जास्त होऊ शकते.
 • ऑनलाईन अर्ज दिनांक ११/०७/२०२० ते दिनांक १३/०७/२०२० अखेर करता येतील, समक्ष अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
 • या नियुक्ती प्रक्रियेचे अनुषंगाने कोणत्याही कार्यवाहीबाबत अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार मा. महापालिका आयुक्त यांना आहेत.
 • कागदपत्रे तपासणी व टंकलेखन चाचणीसाठी ठिकाण व वेळापत्रक, निवडयादी, प्रतिक्षा यादी, उमेदवारांसाठी काही सूचना असल्यास केवळ पुणे महानगरपालिका www.pmc.gov.in या संकेतस्थळावर भरती या सदरात प्रसिद्ध केल्या जातील, याबाबत उमेदवारांना वेगळा पत्रव्यवहार अथवा संपर्क साधला जाणार नाही याची नोंद घ्यावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here