Solapur Zp inviting online applications to fulfill 3824 vacancies of various posts, Interested Candidates send their applications via e-mail before 13 July 2020.

Recruitment Overview
Name of Organization Total No Of Vacancies
Solapur ZP 3824
Recruiter Official Website
http://zpsolapur.gov.in/
Application Mode Application Period
09 July 2020 to 13 July 2020 Online / E-Mail
Posts Details
Post Name Physician
No of Vacancies 104 Vacancies
Pay Scale 75000/-
Qualification & Experience
MD Medicine
Age Limit Upto 70 Years

Post Name Anesthetist
No of Vacancies 71 Vacancies
Pay Scale 75000/-
Qualification & Experience
Degree / Diploma in Anesthesia
Age Limit Upto 70 Years

Post Name Medical Officer
No of Vacancies 454 Vacancies
Pay Scale 60000/-
Qualification & Experience
MBBS
Age Limit Upto 70 Years

Post Name AYUSH MO
No of Vacancies 443 Vacancies
Pay Scale 30000/-
Qualification & Experience
BAMS / BUMS
Age Limit General Category Candidates : Upto 38 Years
OBC Category Candidates : Upto 41 Years
SC/ST Category Candidates : 43 Years

Post Name Staff Nurse
No of Vacancies 2683 Vacancies
Pay Scale 20000/-
Qualification & Experience
GNM /B.Sc Nursing
Age Limit
General Category Candidates : Upto 38 Years
OBC Category Candidates : Upto 41 Years
SC/ST Category Candidates : 43 Years

Post Name X-Ray Technician
No of Vacancies 69 Vacancies
Pay Scale 17000/-
Qualification & Experience
Retired X-Ray Technician
Age Limit
General Category Candidates : Upto 38 Years
OBC Category Candidates : Upto 41 Years
SC/ST Category Candidates : 43 Years

Selection Procedure
Candidate Selection Will be done as per Educational Qualification
How to Apply
Eligible and interested candidates can send their applications via E-mail before last date. to apply download detailed advertisement, take a printout of application, fill application and scan required documents as mentioned below

 • Fill application with pen
 • Scan all Educational and other certificates mentioned below
  • Fully Filled Application Form
  • 10th Mark sheet
  • 12th Mark sheet
  • Graduation Mark sheet (All mark Year wise sheets)
  • Graduation Certificate
  • Certificate of Medical Council Registration (If Applicable)
  • Typing Certificate (If Applicable)
  • Caste Certificate
  • Experience Certificate (Only Govt. Approved Organization)
  • Age Certificate
  • Domicile Certificate
  • Recent Passport Size Photo

Scan all documents in PDF format Only, Send Application with scanned documents @ covidsolapur2020@gmail.com, and also mentioned “Application For the post of (POST NAME)” in E-Mail Subject

Note
Duration of job will be 3 months only


Details in Marathi

सोलापूर जिल्हयातील कोवीड १९ साथरोगांच्या अनुशंगाने स्थापन केलेल्या १) कोविड निगा केंद्र (CCC) २) समर्पित कोविड आरोग्य केंद्र (DCHC) ३) समर्पित कोवीड रुग्णालय (DCH) केंद्रांकरिता आवश्यक असलेल्या रिक्त पदांची पदभरती प्रक्रिया निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पध्दतीने मानधन तत्वावर आरोग्य विभाग, जि.प.सोलापूर येथून राबविण्यात येत असुन, खालील तक्तातील पात्र उमेदवारांकडून ई मेल व्दारे अर्ज मागविण्यात येत आहे.

अटी व शर्ती :

 1. इच्छुक उमेदवारांनी दि.०९/०७/२०२० ते १३/०७/२०२० रोजी सायं.५.०० वाजेपर्यंत या कार्यालयाच्या उपरोक्त नमुद ई-मेल वरच अर्ज सादर करावा. अर्जासोबत
  1. प्रथम अर्जाचा नमुना
  2. १० वी गुणपत्रक
  3. १२ वी गुणपत्रक
  4. पदवी/पदवीका भाग १,२,३,४ चे गुणपत्रक
  5. पदवी प्रमाणपत्र
  6. कौन्सिल कडील नोंदणी (पदांना लागू असेलतर)
  7. टायपिंग प्रमाणपत्र (पदांना लागू असेलतर)
  8. जात प्रमाणपत्र
  9. शासकिय/निमशासकिय संस्थामध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र
  10. वयाचा पुरावा
  11. अधिवास प्रमाणपत्र
  12. उमेदवाराचा सद्याचा पासपोर्ट साईजचा फोटोसोबत जोडलेल्या अर्जाच्या नमुन्यासह स्कॅन करुन एकाच पिडीएफ फाईलमध्ये सर्व कागदपत्रासह, (पीडीएफ फाईल चे नाव हे अर्जदाराने आपले पुर्ण नाव टाकावे.) ई-मेल वर सादर करावा. उमेदवाराचे अर्ज फक्त ई-मेलद्वारे स्विकारण्यात येतील. एकाच पी.डी.एफ मध्ये अर्ज नसल्यास, उमेदवारांचा अर्ज ग्राहय धरला जाणार नाही यांची उमेदवारांनी नोंद घ्यावी. अर्ज पोस्टाद्वारे कुरिअर/प्रत्यक्षात आलेले अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. एका उमेदवाराने एकाच पदासाठी अर्ज करणे अनिवार्य ही यांची नोंद घ्यावी.
 2. सदर पदासाठीच्या अर्जाचा नमुना www.zpsolapur.gov.in या संकेतस्थळावरुन download करावा .
 3. उमेदवाराने सोबत जोडलेल्या अर्जाच्या नमुन्यामध्ये पदाचे नांव आणि अर्ज कोणत्या केंद्रासाठी करण्यात येत आहे. ते नमुद करावे, तसेच खाडातोड, अवाचनिय अर्ज सादर करु नये अन्यथा संबंधित उमेदवाराचा अर्ज ग्राहय धरला जाणार नाही. याची उमेदवाराने नोंद घ्यावी.
 4. कौन्सीलकडील नोंदणीबाबत अथवा इतर कोणत्याही कागदपत्रांची असलेली वैधता ही चालू कालावधीतील असावी. तथापि वैध प्रमाणपत्र नसलेल्या उमेदवारांचा अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
 5. उपरोक्त जाहिरातीतील पदाकरिता सोलापूर जिल्हयात सक्षम काम करण्यास तयार आणि मधुमेह/उच्च रक्तदाब/हृदयविकार इ.नसणाऱ्या सेवानिवृत्त कर्मचारी/अधिकारी,बॉड संपलेले वैद्यकिय अधिकारी यांना सदर पदभरतीकरीता प्राधान्य देण्यात येईल. सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी यांनी अर्जात शासकिय सेवेतुन सेवानिवृत्त झाले त्याबाबतची सर्व माहिती व पुरावा अर्जासोबत सादर करणे अनिवार्य आहे.
 6. उमेदवारांनी ए-४ साईज कागदावर संगणकीकृत किंवा टंकलिखीत केलेल्या सोबत जोडलेल्या विहीत नमुन्यातील अर्जातच परिपूर्ण माहिती भरुन अर्ज व संपूर्ण आवश्यक दस्ताऐवज स्कॅन करुन covidsolapur2020@gmail.com या मेल आयडीवर सोबत दिलेला अर्ज, इतर शैक्षणिक अर्हतेची कागदपत्रे एकाच PDF File मध्ये सादर करावे. PDF File करिता उमेदवारांनी स्वताःचे नाव देण्यात यावे. उमेदवारांनी ई-मेलच्या विषयामध्ये “Application For the post of …. (पदाचे नाव)….. स्पष्ट नमुद करावे. विहीत मुदतीनंतर ई-मेलद्वारे प्राप्त झालेले अर्ज आणि अपुर्ण माहितीचे अर्जाचा विचार केला जाणार नाही.
 7. सदरचे पदे प्रथम ०३ महिन्याच्या कालावधीकरिता किंवा कोवीड १९ साथ असेपर्यंन्त, जे आधी घडेलते, या कालावधीकरिता कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्यात येईल व कालावधी संपताच नियुक्ती आपोआप संपुष्टात येईल. यांची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 8. पदासमोर नमुद मानधन हे एकत्रित मानधन असुन त्याव्यतिरीक्त इतर कोणतेही भत्ते देय राहणार नाहीत.
 9. ई मेल द्वारे प्राप्त झालेल्या अर्जावरुन व उमेदवारांच्या शैक्षणिक अर्हतेवरुन कार्यालयस्तरावर मेरीट लिस्ट तयार करण्यात येईल.
 10. मेरीट लिस्ट तयार करताना Qualifying Exam मध्ये मिळालेले गुण उच्च शैक्षणिक अर्हता व शासकीय/निमशासकीय कार्यालयाचा अनुभव या बाबींचे गुण एकत्र करुन मेरीट लिस्ट तयार करण्यात येवुन संबंधित पात्र उमेदवारास नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात येतील.
 11. अर्जदार हा संबंधित पदासाठी शारिरीक व मानसिक दृष्टया सक्षम असावा तसेच अर्जदाराविरुध्द कोणताही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा .
 12. पुर्ननियुक्तीबाबत, शासकीय नियमित सेवेत सामावून घेणेबाबत किंवा शासनामार्फत सेवा संरक्षणाबाबत ___ उमेदवारांना कुठलाही दावा करता येणार नाही.
 13. अर्जदाराला कंत्राटी कालावधीत त्यांचे सोईनुसार ठिकाण बदलुन मिळण्याची मागणी करता येणार नाही. नियुक्ती दिलेल्या उमेदवारांनी मुख्यालयी राहुन सेवा देणे बंधनकारक राहील.
 14. मुलाखत होणार नसल्याने तसेच पदभरतीचे अर्ज ईमेल द्वारेच घेण्यात येत असल्याने कोणत्याही उमेदवाराने कार्यालयात प्रत्यक्ष भेट देवु नये. तसेच आरोग्य विभाग, जि.प.सोलापूर येथे कोणत्याही प्रकारचे अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
 15. अर्जदारांनी आपल्या अर्जावर त्यांचा सध्या सुरु असलेला मोबाईल नंबर व ईमेल आय डी अचुक नोंदवावा. तसेच ते भरती प्रक्रिया पुर्ण होईपर्यत सुस्थितीत राहील याची दक्षता घ्यावी .

 16. भरतीप्रक्रिये दरम्यान उमेदवाराने चुकीची माहिती सादर केल्याचे, कोणतीही माहिती दडवून ठेवल्याचे, दबाब तंत्राचा वापर किंवा अनुचित मार्गाचा अवलंब केल्याचे आढळून आल्यास कोणत्याही टप्प्यावर त्याची उमेदवारी / नियुक्ती कोणतीही पुर्वसुचना न देता रदद करण्यात येईल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here